पुणे : दिव्यशक्तीचा चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेद्र कृष्ण महाराज सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. यातच त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टिका केली जात आहे. तर धीरेंद्र महाराज जिथे असेल तिथे ठोकून काढा, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. तर काॅंग्रेसनेही त्यावर निशाणा साधला आहे.
“माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास
अंधद्धेला प्रोस्साहन देणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्राच्या संत परंपरेबद्दल काय माहित आहे? जो भोंदू बाबा एक आव्हान मिळताच नागपुरातून पळून गेला. त्यांनी उगाच अक्कल पाजळू नये. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या या बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई कधी करणार ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन
संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी खुप मारत होत्या. त्यामुळेच त्यांना प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांना जर चांगली पत्नी मिळाली असती तर ते पत्नीच्याच प्रेमात गुरफूटून गेले असते. त्यांना मारहाण करणारी पत्नी मिळाली असं आक्षेपार्ह वक्तव्य धीरेंद्र महाराज यांनी केलं आहे. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर कडाडून टिका होत आहे.
“..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण
धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे, अवघे कोलियाचे वर्म अंडी, घातलिया, तोंडी खीळ पडे. अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल तर, मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी, हा जिथे दिसेल तिथे याला ठोकून काढा. असा थेट इशाराचा मिटकरी यांनी दिला आहे.
Read also
- “मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
- “हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?
- शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!