नांदेड : देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या ऑफरवर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल करत चंद्रकांत पाटलांची फिरकी घेतली आहे. तसंच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यावेळी पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे.
देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिलीय. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे
दरम्यान, सांगलीतही त्यांनी अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं सांगत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे ‘टार्गेट’ दिले होते.
Read Also :
- आर्यन खानची केस फेक आहे, पैसे उकळण्यासाठी NCB ने खोटे पुरावे सादर केले – नवाब मलिक
- भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धातास खलबतं; दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा ललकारलं
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी