औरंगाबाद : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना जवळपास निश्चित झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांच्यासह आप, रवीकांत तुपकर आणि स्वराज्य पार्टी तिसरी आघाडीबाबत चर्चा करतांना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात नव्या आघाडीची चर्चा सुरू आहे. अशातच आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा करणार आहे.
हेही वाचा..पुण्यातील ‘या’ मतदारसंघात सांगली पॅटर्नची चर्चा, जागा एक, इच्छूक पाच, रंगत वाढली
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. अशी माहिती त्यांनी दिलीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावरून राजकारणात मोठी उलथापालथ होणार का ? अशा प्रश्नांना यामुळे उधाण येत आहे.
हेही वाचा…विधान परिषदेत आणखी डझनभर आमदार बसणार, मुहूर्त ठरला
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे महाविकास आघाडीचा मोठा फटका बसला होता. यानंतर अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीपुर्वी वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र जागावाटवरून वंचित आणि महाविकास आघाडीचं सुत जळलं नाही. अशातच आता पुन्हा विधानसभेबाबत प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
I will be making a BIG announcement today.
Press Conference at Subedari Government Guest House in Aurangabad.
See you at 4 PM. https://t.co/a9I8zXYPnH
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा..कॉंग्रेसच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, पर्वती मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा..विशाळगडावरील घटनेवरून शाहू महाराजांनी संभाजीराजेंच्या आक्रमकतेचा केला जाहीर निषेध
हेही वाचा..छगन भुजबळांनीच योग्य वेळी शरद पवारांचा कार्यक्रम वाजवला, भुजबळ बेईमान माणूस