मुंबई : रा.स्व.संघ आणि भाजपविरोधी भूमिकांसाठी ओळखले जाणारे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी, ‘मराठा मार्ग’ मासिकामधील संपादकीय लेखात घेतलेल्या भूमिकेने, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखात त्यांनी, आगामी निवडणुकांसाठी ‘भाजपसोबत युती हाच पर्याय’ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, आता मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, भाजपसोबत येणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरण, राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध ८ हजार पानांचं आरोपपत्र
आपल्या वक्तव्याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगतिले, ‘संभाजी ब्रिगेड-भाजपची युती हि सध्याच्या राजकारणाची गरज आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे ‘राष्ट्रवादीचं पिल्लू’ अशी अनेक वर्षे आमची हेटाळणी झाली. पण आता वेळ आली आहे, भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने या युतीचा विचार करावा. राजकारण हे राजकारणासारखं व्हावं आणि त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पर्याय आमच्या पुढे जवळपास नाहीच आहे. आता भाजपचा पर्याय उरला आहे.’
मुंबईतील अतिरेकी जान मोहम्मद २० वर्षापासून दाऊद गँगच्या संपर्कात होता; ATS चा मोठा खुलासा
‘संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी आम्ही स्वबळावर लढलो, पण मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्था वगळता लोकसभा-विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही. सध्या राजकारणात युती-आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे असं नाही, तर देशभरातही आहे. राजकारणातच तशी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे, हा पर्याय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तपासून पाहावा आणि दोन्हीकडून चर्चेअंती अजेंडा ठरवावा आणि पुढचं राजकारण करावं,’ असा सल्ला त्यांनी दिला.
किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांनी उडवली खिल्ली
तसेच, ‘भाजप सत्तेत आली तरी काही हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून लांब ठेवावे, अशी सध्याच्या सत्ताधारी पक्षांची मानसिकता आहे. काही लहान पक्ष देखील संभाजी ब्रिगेडबाबत गैरसमज पसरवत असतात. अशावेळी, संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपशी युती हाच पर्याय उरतो. राजकारणामध्ये राजसत्ता-लोककल्याण हे सगळ्यांचंच आहे. आम्हाला आमची विचारधारा आहे,’ असं ते म्हणाले.
महाराष्ट्र पोलीसांना काम करू द्या, उगाच कुणी राजकारण करू नये – दिलीप वळसे पाटील
दरम्यान, पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी रेखाताई खेडेकर भाजपच्या आमदार होत्या. तरीही खेडेकर यांनी संघ-भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप हा RSS च्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. आणि मराठा सेवा संघाची सगळी मांडणी ही RSS विचारधारेच्या विरोधात आहे. मात्र तरीही खेडेकर यांनी भाजपसोबत जाण्याचा विचार मांडल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस
- महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला? सुरेखा पुणेकर संतापल्या
- ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस
- मोदी आणि फडणवीस ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, आंदोलन केवळ नौटंकीसाठी – नाना पटोले
- किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांनी उडवली खिल्ली