मुंबई: मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्र्रात राजकीय वातावरण तापलेलं आहे, जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिली तेव्हापासून महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा घेतली होती.
आता या वरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केल आहे, पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही. जे नातवाची लायकी काढतात ते काय मराठ्यांना आरक्षण देणार? असा खोचक सवाल निलेश राणेंनी पवारांना विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून टीका केली आहे. आता यावरून नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही. https://t.co/8gAd4OhL3H
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 30, 2020
दरम्यान काल शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं होत, त्यानंतर आता त्यांच्यावर राणेंनी टीका केली आहे.
Read Also:
बचत गटातील महिलांची कर्ज माफ करावी, मनसेकडून कोरोनाकाळातील सर्वात मोठा मोर्चा !
https://t.co/UABVLjgw6h#MNS #RajThackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020