राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही.
बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही आणि उद्याही हृदयात राहील. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मी काम केलं आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांची चांगले संबंध आहे. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवतो. असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले
उद्धव ठाकरेंसोबत माझं नेहमी बोलणं होतं. मात्र राज्यातील राजकारणात आणि पक्षात माझी सध्या काही भूमिका नाही. मी सध्या दिल्लीत काम करतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं, याबाबत राज्यातील नेते निर्णय घेतात. राज्यातील राजकीय निर्णयांवर राज्यातील निर्णय देऊ शकतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.