मुंबई – यंदाच्या हिवाळी अधिवेशाची तारीख संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. अधिवेशनाचा कालावधी किती अेसल हे मात्र अजूनही ठरलं नाही. 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात नाही तर मुंबईतच होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक
22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं असेल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. या अधिवेशनात 12 बिले, 11 विधेयके मांडली जातील.अधिवेशनात प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, अशी माहिती परबांनी दिलीय. अधिवेशन वाढवण्याचा निर्णय 24 डिसेंबरला होईल.
संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
दरवेळी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जातं, मात्र मुख्यमंत्री स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याने मुंबईत अधिवेशन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थसंकलपीय अधिवेशन नागपुरला व्हावे अशी विरोधकांची मागणी होती, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली ,मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
Read Also :
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
- अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
- …आणि पंकजा ताईंना पान तयार करण्याचा मोह आवरता आला नाही!
- लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका
- “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी का?”