नगर : नगर जिल्ह्यातील खर्डा इथल्या भुईकोट किल्ल्यावर, देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून फडकवण्यात येणाऱ्या या भगव्या रंगाच्या झेंड्याची उंची ७४ मीटर असणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
“नगर जिल्ह्यातील खर्डा किल्ल्याच्या कातळांनी निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. इथे हा ध्वज फडकवण्याआधी, तो देशातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि विठ्ठलाच्या पंढरीमध्ये फिरवला जाईल आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरला ‘स्वराज्य ध्वज’ खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवीन ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
माझ्या मतदारसंघात खर्ड्याच्या किल्ल्याच्या आवारात ७४ मीटर विक्रमी उंचीवर 'स्वराज्य ध्वज' लावण्यात येणार असून राज्यातील प्रमुख संतांच्या हस्ते या ध्वजाची काल पूजा केली. याबाबतचा अधिक तपशील या लिंकवर जरूर बघा…👇https://t.co/sFAokJJ11y pic.twitter.com/LqfBBkXDIh
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 16, 2021
ब्रेकिंग! अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, शेवटचा पर्यायही संपला?
दरम्यान, पुढील २ महिने देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संत-महंतांच्या पीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड दुर्गांवर हा ध्वज फिरवला जाणार आहे. “हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण तर ठरेलच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचंही प्रतीक ठरेल,” असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
Read Also :
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप
- “जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान
- “मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ