म्हापसा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात यावेळी विधासभेची निवडणूक चांगलीच रंगली. त्यातच सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस, मगोप या प्रमुख पक्षांसह आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनेक प्रमुख नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने गोव्यातील विधानसभा चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. काल गोवा विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे, दरवेळीप्रमाणे यंदाच्या निवडणूकीत मतदानाचा विक्रमी आकडा गाढल्याने म्हापसाचे भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला
जोशुआ म्हणाले, गोवेकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल तमतदारांचे सर्वप्रथम आभार मानतो. या सर्व मतदारांना भेटून आणि मिळालेला प्रतिसाद पाहून मला माझ्या वडीलांची खुप आठवण येत आहे. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे. विशेषत: त्यांनी कोणालाही मदत करण्यास कधीही नकार दिला नाही.
शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
गेल्या ३ वर्षात आमच्या प्रिय बाबूशशिवाय, माझ्या पाठीशी उभे असलेले कुटूंबीय, जनता आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. बाबांनी ठरवलेल्या तत्वावर मी चालण्याचा यापुढेही प्रयत्न करेल, त्यांच्याप्रमाणेच म्हापसेकरांसोबरोबच गोव्यातील सर्वजनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा देखिल प्रयत्न करेल, असे डिसोझा यांनी सांगितले.
“महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, भाजपा आणि काँग्रेससोबतच आप, तृणमूल काँग्रेस आणि काही अपक्षही या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० मार्चला लागणाऱ्या निकालात कुठल्या एका पक्षाला बहुमत मिळणार की, त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वधारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read also:
- मी फरार नाही, दिल्लीत आहे, पोलिस बोलावतील तेव्हा यायला तयार; आमदार रवी राणांचे स्पष्टीकरण
- गोव्यात तब्बल ७८.९४ टक्के मतदान; कोणाचा झेंडा फडकणार? धक्कादायक निकालाची शक्यता
- शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
- आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
- लढा एसटी विलिनीकरणाचा; कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय म्हणतात… सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवू…