चायनीज वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन भारतासह अमेरिका आणि यूकेत केले जात आहे. अशातच चीनी कंपनी असणाऱ्या शाओमीने सॅमसंग आणि LG या दोन कंपन्यांना चीनमध्ये मोठे आव्हान दिले आहे. या दोन्ही इतर कंपन्यांच्या तुलनेत 5G फोन अर्ध्या किमतीत आणला आहे. सध्या LG Velvet स्मार्टफोनची किंमत जवळपास ७४७ डॉलर आहे. तर शाओमीच्या Mi 10 Lite ची किंमत ३७४ डॉलर आहे.
आता शाओमीच्या या फोनला किती व कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणे महत्वाचे आहे. हा फोन दुकानांमध्ये विकला जाणार नाही तर थेट अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विकणार आहे.
दक्षिण कोरियात कोणत्याही चायनीज कंपनीला हे आव्हान स्वीकारावे लागेल. सध्या 5G स्मार्टफोन वरून कंपनी मोठे आव्हान स्वीकारणार असल्याचे दिसत आहे. सॅमसंग, एलजी, नोकिया, शाओमी, वनप्लस, सह अनेक कंपन्या वेगवेगळ्या भागात 5G स्मार्टफोन लाँच करीत आहे.