पुणे : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी, पुण्यातल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना, ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू असून, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी, ‘महिलांची माफी मागावी नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचे आम्ही थोबाड आणि गाल रंगवू,’ असा इशारा दिला आहे.
थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर
दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नकार दिला असून, त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतां, थोडक्या शब्दांत भाजपचा आणि दरेकरांचा समाचार घेतला आहे. ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत,’ असं विधान त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी साकीनाका दुर्घटनेवरही बोलताना, ‘घटना अतिशय दुर्देवी व वाईट आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आमच्या सर्वांची मागणी आहे,’ असं मत मांडलं आहे.
दरेकरांच्या भाषणबाजीने झाली पक्षाची गोची, आक्षेपार्ह विधानावर पाटील म्हणतात…
तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावर, ‘सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं मला वाटत नाही. मुश्रीफ यांनी स्वतः त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे,’ असं त्या म्हणाल्या. दरम्यान, दरेकरांच्या ‘त्या’ राष्ट्रवादीवरच्या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
‘दरेकर जे बोलले ते बोलीभाषेत बोललं जातं. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही. दररोजच्या बोलण्यात असे वाक्यप्रचार आपण वापरत असतो. त्यामुळे, उगाच पराचा कावळा करुन, याचा वेडावाकडा अर्थ काढू नये. त्यांच्या मनात अश्लील अर्थ नक्कीच नव्हता. भाषणात त्यांनी राष्ट्रवादीला, ‘श्रीमंतांचा पक्ष’ म्हणत, त्यांना गोरगरिबांची कीव वाटत नाही, असं म्हटलं. राष्ट्रवादी पक्ष कसा श्रीमंतांचा, सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा आहे हे दरेकरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Read Also :
- ‘…म्हणूनच पवारांनी राष्ट्रवादीची नवी माडी बांधली,’ दानवेंचा काँग्रेसला जोरदार टोला
- पिंपरी चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप; भाजपचे बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- शिवसेनेच्या “मुका” नंतर आता भाजपचा “मुका” वादाच्या भोवऱ्यात.!
- करुणा शर्मा यांची न्यायालयात सुनावणी, आज होणार फैसला सुटणार की अडकणार?
- मृत्यू दाखल्याची कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम