मुंबई : माझ्यावरचा राग माझ्यावरच काढा तो मुंबईवर काढू नका, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आरे मेट्रो कारशेडला परवानगी दिली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे दुख: झालं असून तो प्लॉट कुणाचा खासगी नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला. यावर आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद
एव्हाना आपण म्हणजे मुंबई नव्हे हे माजी मुख्यमंत्र्यांना समजायला हवं होतं. पंरतु शरद पवारांशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याने या दु:खाने ते सावरू शकले नसावे. परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. असा टोला भाजप आमदार रामसातपुते यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर आम्ही फक्त जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
ज्यांनी हे सरकार केले, त्यांच्या मते त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो. जर हे पुर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्ष पुर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. त्यामुळे लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे. मतदारांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
दरम्यान, आरे भागातील ज्याठिकाणी 25 टक्के काम झालं आहे. त्याच ठिकाणी काम सुरू होईल. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारमध्ये आरे कार शेडचा मुद्दा आगामी काळात चांगलाचं गाजण्याची शक्यता आहे.
एव्हाना आपण म्हणजे मुंबई नव्हे हे माजी मुख्यमंत्र्यांना समजायला हवं होतं. परंतु शरद पवारांशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याने या दुःखातून ते सावरू शकले नसावे!
परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही! #Maharashtra pic.twitter.com/lk1dJg15c5— Ram Satpute (@RamVSatpute) July 1, 2022
Read also
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- “राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
- “लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
- मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब