मुंबई : ”मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण हे माझ्या लक्षात नाही. ही माझी कमतरता आहे”, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांवर पलटवार केला आहे. ”शरद पवार आणि माझ्या मुख्यमंत्री पदामध्ये फरक आहे” असे फडणवीस म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या शिवसेनेची पुण्यात मोर्चेबांधणी; संजय राऊतांच्या जोर बैठका
”मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. पवारसाहेब मोठे नेते आहेत. पवार हे चारवेळा मुख्यमंत्री होते. पण ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही. कधी-कधी दोन वर्षे, तर कधी तीन वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहता आलं. विरोधी पक्षनेता म्हणून मी समाधानी आहे, हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ आहे”, असा जोरदार पलटवार फडणवीसांनी केली.
अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत दर्शवली होती. यावेळी त्यांनी ‘मला वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. मला मुख्यमंत्री नाही, असं कधीच जाणवत नाही. तुमच्यासारख्या नेत्यांमुळे मला ही जाणीव होत नाही. माणूस कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाहीतर, तो काम काय करतो हे महत्वाचं आहे’ असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका झाली. याचवरून शरद पवारांनी देखील फडणवीसांवर टिप्पणी केली होता. ”मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण हे माझ्या लक्षात नाही. ही माझी कमतरता आहे” असे पवार म्हणाले होते.
Read Also :
- वेळ देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही; 25 ऑक्टोबरपासून संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार
- रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल? किरीट सोमय्याचा सवाल
- २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची माहिती; वाचा नवी नियमावली
- मोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा निर्णय
- …तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार ९० हजार मतांनी कसा निवडून आला? पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न