IMPIMP

“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..!

Chandrashekhar Bawankule vs Uddhav Thackeray

मुंबई :  एकतर राज्यात देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहिन, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला विधानसभेसाठी ललकारलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर देखील जोरदार टिकास्त्र सोडलंय. यावरून आता भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय आयुष्य संपवण्यासाठी ठाकरेंना १०० जन्म घ्यावे लागतील असा टोला लगावला आहे. त्यावर आता ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा..“मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच”, भाजपची ठाकरेंवर जहरी टिका

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्र यांना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रताही नाही, त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरेंनी नी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही. असा पलटवार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

हेही वाचा…उमेदवारीसाठी हडपसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अन् शिवसेनेत संघर्ष ; भाजपने दावा सोडला ? 

त्यावर तुमच्या या हातभार खलित्यातून स्पष्ट आहे की तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात. इतना डर होना भी चाहिए..! असं म्हणत अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचलं आहे.

दरम्यान,  निवडणुक शेवटच्या टप्प्यांपर्यंत व्हायला पाहिजे होती, उरलेल्या कपड्यांचे तुकडेही उतरवले असते. एका बाजूला सत्ता, पैसा, शासकीय यंत्रणा, निवडणूक आयोग आणि माझ्याकडे तुमच्या सगळ्याचं बळ. आमदार, खासदार खरेदी केले असतील पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते विकत घेता येत नाहीत. सगळं सहन करून उभा राहिलोय. एक तर तु राहशील नाहीतर मी राहीन असा इशारा देखील ठाकरे यांनी दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!

हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला 

हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील” 

हेही वाचा..माढ्यात दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात झुंजणार ? शरद पवारांची मोठी खेळी 

हेही वाचा..“एक तर तु राहशील, नाहीतर मी राहीन”, उद्धव ठाकरे संतापले, कुणाला दिला इशारा ? 

 

 

Total
0
Shares
Previous Article
amol mitkari with chitra wagh

"राज्यातलं वातावरण खराब करण्यासाठी चित्रा वाघ, मिटकरींना सुपारी..!"

Next Article
Pawar spies 20 youths

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पवारांनी २० तरूण हेरले ; परळी, बारामती, कागल ते दिंडोरीत धक्का देणार ?

Related Posts
Total
0
Share