पुणे : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबंग नेत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक डॉ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षस्रेष्टींकडे पाठवत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने मनसेला खिंडार पडले आहे.
बावनकुळेंचे गडकरी निवासस्थानी कोडकौतुक; कांचनताई गडकरी यांनी औक्षण करून केले विजयाचे स्वागत
यासोबतच रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पत्र देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहल्याने खळबळ माजली आहे. अतिशय भावनिक शब्दांचा आधार घेत त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. ‘राजसाहेब आपण कायम माझ्या हृदयात रहाल’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
“काँग्रेसला स्वतःची मते राखता आली नाहीत, ते राज्याचे नेतृत्व काय करणार?”
पत्रात ठोंबरे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”\, असं रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.
कोण आहेत रुपाली पाटील ठोंबरे?
रुपाली पाटील ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राज ठाकरे यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळख आहे. महिला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विशेष काम, जनसामान्यांच्या प्रश्नाकरिता आंदोलनासाठी त्या जाणल्या जातात. मनसे प्रवेशानंतर त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा पदावर काम केलं आहे. पुणे शहराच्या महिला उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी मागील काळात अत्यंत चांगलं काम केलं होतं. नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
Read Also :
- बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !
- मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
- ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक
- एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस
- “हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या”