विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यूजीसीच्या याच निर्णयाविरोधात युवासेनेने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली
“विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना अंतिम परीक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा जेणेकरुन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे”, असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं
“भरतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दहा लाखांच्या पार चालला आहे. अजूनही देश कोरोना संक्रमणच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत देशभरातील विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता याचा कुठलाही विचार न करता यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
“केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मंत्री आणि यूजीसी यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठांनी मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन सप्टेंबर महिन्यात घ्याव्यात, असे जाहीर केले आहे. मात्र, या परीक्षा घेण्यासाठी यूजीसीने जाहीर केलेली 31 मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नाहीत”, असं वरुण देसाई म्हणाले आहेत.
India has crossed 10lakh mark for Covid Cases. Yet @ugc_india is adamant on compulsory examinations. We have written to them and requested reconsideration multiple times but to no avail
Hence, Yuva Sena has filed a Writ Petition (PIL) in the Supreme Court of India. @AUThackeray pic.twitter.com/WPnZVfpdIW
— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 18, 2020
Maharashtra Govt has already taken a decision to cancel final year exams.
But covid cases are on the rise in almost all the states and hence Yuva Sena had requested for cancellation of exams throughout the country in these extra ordinary times.
— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 18, 2020