पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या देशातील इतर शहरांच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. महापौरांसह अनेक नगरसेवक, प्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. अशा स्थितीमध्ये प्रतिनिधी घरातच थांबत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उपाययोजना न केल्याने नागरिक संतप्त झाले आहे.
कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील रामवाडी परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. यावर ‘नगरसेवक हरवले आहेत, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडतो’ असे लिहिलं आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे. युवक काँग्रेसने केलेल्या बॅनरबाजीत आता नागरिकांच्या गरजेच्या वेळी गैरहजर आणि बेपत्ता असणाऱ्या नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे.