पुणे : एका महिलेसोबत बेडरुममधील व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले सोलापुरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हा दाखल करून तो सोलापुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याचं समजत आहे.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार फुटला; द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक महिलेसोबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमे-यासमोर येऊन देशमुख यांच्यावर आरोप करत आहे. यात देशमुख हे अंतर्वस्त्रावर दिसत आहेत. संबंधित महिला श्रीकांत देशमुख याने फसवलं असल्याचं सांगताना दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख यांनी उठुन मोबाईलचे चित्रिकरण बंद केल्याच दिसत आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी त्या महिलेविरुद्ध हनीट्रैपचा आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तकार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व यानंतर देशमुख यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
एसटी आंदोलनातून राज्य सरकारवर गरळ ओकणारे पडळकर, खोत आता गप्प का?
हे प्रकरण विवाहबाह्य संबंधाच्या अवतीभवती असल्याचं दिसुन आलं आहे. श्रीकांत देशमुख आणि पीडित महिलेची ऑडिओ क्लिपही सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्याचीही चर्चा सर्वत्र झाली. संबंधीत पीडित महिलेने याबाबतची तक्रार पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार देशमुश यांच्यावर कलम 76,77,504,506 यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“राजकारण हे तुमचं काम नाही, म्हणून तुमची ही अवस्था”
दरम्यान, संबंधित महिलेने देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भिती वाटत आहे. अस मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. देशमुख है आर्थिक व राजकीय बलाढ्य असल्याने मला बाहेर जाऊन फिर्याद देणे शक्य नसल्याने ही फिर्याद इमेलद्वारे दाखल करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Read also
- दिपाली सय्यद अन् राऊतांकडून प्रकरण चिघळवण्याचं काम; यामुळेच शिवसेना लयास गेली?
- पद्मश्री लक्ष्मण मानेंनी हाताला बांधलं घड्याळ; त्यांच्यासह १८ जणांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
- महाराष्ट्र सरकारकडून एसटी अपघातातील मृतांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर
- “३ वर्षांपासून तोंड दाबून मार सहन केलं, पण आता नाही”; ढाण्या वाघानी सोडली सेना
- “काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, त्यासाठी..;” गडकरींची भर कार्यक्रमातच टोलेबाजी