मुंबई : राज्यातल्या महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोरोनावर यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा कोरोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला. गंमतीचा भाग सोडा पण आपण कोरोना काळ असूनही खूप चांगलं काम केले आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.
आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.