राज्यात अनलॉक सुरू झालेले असताना प्रार्थना स्थळे मात्र अद्याप बंद आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात भाजपच्या वतीने ठीक ठिकाणी घंटा नाद आंदोलन करत सरकारने मंदिर खुली करावीत अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचे पडसाद भोसरीमध्ये देखील पहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी भोसरीतील मारुती मंदिर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
‘पुन:श्च हरिओम’ असा नारा देणाऱ्या राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केलेली नाहीत. परिणामी, राज्यातील भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, अशी जनजागृती करणाऱ्या सरकारने मंदिरं खुली करावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केली होती. मात्र, ‘अनलॉक’मध्ये मंदिरं अद्याप खुली केली नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी भोसरीतील मारुती मंदिर येथे घंटानाद आंदोलन केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://twitter.com/maheshklandge/status/1299599887156142082
हे देखील वाचा
मुख्यमंत्र्यांना मंदिरांपासून काय त्रास आहे ? नारायण राणे यांचा सवालhttps://t.co/xj27Q5IvKa@NiteshNRane @NiteshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 29, 2020