“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. ” असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरील चर्चा अद्यापही सुरु आहेत. शरद पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला
“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला ते म्हणाले, “विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,”