काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना लॉकडाऊन, भारत आणि चीनमधील तणाव यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. मात्र त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे खोट्या बातम्या पसरवत आहेत. तुम्ही आणि तुमच्या आईंनी चीनकडून पैसे घेतले असा गंभीर आरोप नड्डा यांनी केला आहे.
जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट करत राहुल आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल केला आहे. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. पीएम केअर फंडातील प्रत्येक पैशाचा हिशेब आहे आणि लोकांच्या हितासाठीच तो पैसा वापरला जातोय असंही त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये ट्विटर वॉर रंगलेलं पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राहुल गांधी यांनी वृत्तपत्रातल्या काही बातम्यांचा आधार घेत सोशल मीडियाचा गैरवापर आणि पीएम केअर्स फंडाबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावरून नड्डा यांनी जोरदार टीका केली आहे. त्यासोबतच तुमचं सगळं करियर हे खोट्या बातम्या पसरविण्यातच गेलं असा टोलाही लगावला आहे. ‘तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले. यापेक्षा खालच्या पायरीवर कोणी येऊ शकतं का ?’ असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
Your family’s dubious legacy includes appropriating a permanent position in PMNRF and then diverting money from PMNRF into your family trusts.
You and your mother also took money from the Chinese to hurt our national interest. Can anyone stoop lower?
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 17, 2020