मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद वाढत चालला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैऱ्या झडत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांनी आरक्षण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा सुरू झालीय.
आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो आता आम्हाला आरक्षण सोडायला हवं. यातून समाजातील अशा लोकांना फायदा होईल जे आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहेत. असं ओबीसी मेडिका असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी सांगत आरक्षण सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच आम्ही १५-२० सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ओबीसी आरक्षण त्याग करत असल्याचं प्रतिज्ञापत्र देणार आहोत. असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा..लक्ष्म्ण हाकेंच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून मागण्या मान्य, उपोषण स्थगित
पुढे बोलतांना राहुल घुले म्हणाले की, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रगतशील महाराष्ट्रात आरक्षणापासून जातीय द्वेष वाढत आहे. सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून वाद सुरू आहे. आरक्षणाचा लाभ मिळाल्याने आजपर्यंत अनेक लोक सक्षम झालेत. ज्यांची प्रगती झाली. अशा लोकांनी आरक्षणाचा त्याग केला. तरच समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
READ ALSO :
हेही वाचा..विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर, ‘या’ पक्षातील आमदारांची मुदत संपली
हेही वाचा..विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनी कसली कंबर, गुपचूप बैठका अन् दिल्लीत बरच काही
हेही वाचा..विधानसभेपुर्वी भाजपला गळती सुरू, माजी केंद्रीय मंत्र्यांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी
हेही वाचा..“महायुतीतील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर”, शरद पवार गटाने डिवचलं