मुंबई : बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपास शंका उपस्थित करत आरोप केले होते. त्याचबरोबर हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे.
पांडे यांनी नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. पांडे यांच्या जदयूतील प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली असून, बिहारचे प्रभारी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्लाही दिला आहे.
देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना, जर मुंबई पोलिसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही, तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 28, 2020
Read Also
पूनम महाजन यांचे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल,केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यताhttps://t.co/FI9inzLBPU#PoonamMahajan #Bjp @poonam_mahajan
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020