मुंबई : हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप माजी खासदार संभाजी राजे यांनी केला. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काही चित्रपट गृहात जाऊन या चित्रपटाचे शो बंद पाडले. तसेच काही प्रक्षेकांना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडासह राष्ट्रवादीच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मनसेने उडी घेतली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेनेला डिवचलं आहे.
भारत जोडो यात्रेत नागपुर येथील काॅंग्रेस नेत्याचं निधन..! महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला अन्…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अलिकडचे ‘वेडात मराठे वीर दौडला’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. त्यानंतर संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीने ठाण्यात या चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेटरमध्ये येत हल्लाबोल केला. तसेच काही मनसेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टिकास्त्र सो़डलं.
“फडणवीस त्या हिरव्या सापाला फेकून द्या, नुकसान तुमचचं होईल”; चंद्रकांत खैरे
त्यावर आता अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांनी या चित्रपटांमध्ये काही पैसे गुंतवले असल्याचा आरोप केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले अशी चर्चा आहे. कदाचित म्हणून काही जणांचा इतका आकांड तांडव सुरू नसेल ना.! असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला. तसेच याबाबत राज ठाकरे यांनी खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणून विचारतोय. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- कुणी पोलिसांना, कुणी राजकीय नेत्यांना, तर कुणी काय..? शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची संपुर्ण यादी
- सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली..! अर्वाच्च भाषेत सेनेच्या नेत्यांवर टिका
- “हा विषय माफी मागून संपणार नाही, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा”
- नोटाबंदीला 8 वर्ष पुर्ण..! राष्ट्रवादीकडून ”नोटाबंदीचा श्रद्धांजली” वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन
- राजकारण तापलं…! सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं शिष्ठामंडळ राज्यपालांच्या भेटीला