अहमदनगर : शिखर बॅंक घोटाळा प्रकरणातील मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान दिल्याची बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील काही राजकीय नेत्यांनी यावरून चांगलीच टिका केली. त्यावर आता या प्रकरणावर स्वत : अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
याबाबत अण्णा हजारे म्हणाल्या की, मला याबाबत काही माहिती नाही, मी वर्तमानपत्रात पाहिलं तर माझ नाव होतं. मी काहीही बोललं नाही. तरीही माझं नाव बघून मला धक्का बसला. माझ्या नावाचा दुरूपयोग करून काही लोक स्वार्थ साधतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. असंही अण्णा हजारे म्हणाले. पंधरा वर्षापुर्वी या प्रकरणावर आवाज उठवला होता. आता यावर येत आहे. क्लिन चीटवर बोलताना हजारे म्हणाले की, लोकांना माहित असेल तर बोलतील. मला यातलं काही माहितच नाही मग कसं बोलणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
या प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अजित पवार गटातील नेते सुरज चव्हाण यांनी अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत टिका केलीय. अनेक यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही. मग त्यावरती क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयीने प्रक्रिया असो की चौकशीची प्रक्रिया असो, त्या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या. त्यानंतर तो क्लोझर रिपोर्ट केला होता. बारा महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशी मागणी करतात.
READ ALSO :
हेही वाचा…“आता मोठा भाऊ, छोटा भाऊ चालणार नाही”, पृथ्वीराज चव्हाणांनी खडसावलं
हेही वाचा..“देशातील जनता जागी झाली, मोदींचं पद कसंबसं वाचलं”, उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक टोला