मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या करूणा मुंडे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र राज्यातील सगळ्याच महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर करूणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
“हा विषय माफी मागून संपणार नाही, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा”
मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती. माझ्यावर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर साईन करून, लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांग, असा दबाव टाकला होता. मला त्यावेळी त्यांनी 50 कोटींची ऑफर देखील दिली होती. नंतर माझी मुले उचलून नेली. तेव्हाही मी महिला आयोगात तक्रार दिली होती. रूपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई केली नाही. मी परळीला पत्रकार परिषद घेण्यासाठी गेल्यावर माझ्या गाडीत बंदुक ठेवली. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाही काहीच कारवाई केली नाही. ते सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. असंही त्या म्हणाल्या.
नोटाबंदीला 8 वर्ष पुर्ण..! राष्ट्रवादीकडून ”नोटाबंदीचा श्रद्धांजली” वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सुषमा अंधारेंना जळगावात पोलिसांनी केवळ विचारपुस केली. मात्र आज महाविकास आघाडी सरकार असतं तर सुषमा अंधारेंना थेट तुरूंगात टाकलं असतं. खासदार नवनीत राणा, केतकी चितळे, करूणा मुंडे या महिलांवर आघाडी सरकारच्या काळात अन्याय झाला. त्यामुळे केवळ एका महिलेच्या नावाने गळा फाडणाऱ्या महिलांनी बहुवचन न लावता, केवळ एक पक्षाच्या नेत्या, किंवा संबंधित महिलेबद्दल बोलावे, ज्यावेळी आपण बहुवचन लावता तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच महिला भगिनी त्यात येतात. मग करूणा मुंडेंही त्यामध्ये येते. त्यामुळे राज्यात इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय? असा सवाल देखील त्यांनी केला.
Read also
- सत्तारांवर निशाणा, कार्यकर्त्यांचे मानले आभार..! कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “अब्दुल सत्तार दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर..”; पेडणेकरांचा हल्लाबोल
- ‘हर हर महादेव’ चित्रपटात राज ठाकरेंनी पैसे गुंतवले का ? राष्ट्रवादीचा सवाल
- कुणी पोलिसांना, कुणी राजकीय नेत्यांना, तर कुणी काय..? शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची संपुर्ण यादी
- सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली..! अर्वाच्च भाषेत सेनेच्या नेत्यांवर टिका