नंदुरबार : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना, औषधांचा काळाबाजर होत असल्याचे देखील समोर आले आहे. कोरोनारुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. यातच आता नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांवर रेमडेसिव्हीरचा साठा विकल्याचा आरोप केला आहे.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळालेला रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकल्याचा गंभीर आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे.
आज नंदुरबारमध्ये रेमेडिसीव्हीरची प्रचंड आवश्यकता आहे. असे असतानाही रोटरी वेलनेस सेंटरने रुग्णांना इंजेक्शन न देता ते बाहेर विकण्याचं काम केलं. दवाखान्यांना अजूनही इंजेक्शन देण्यात आले नाहीत. @IASRajBharud आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हा साठा बाहेर विकला आहे. @DrHeena_Gavit pic.twitter.com/ZUSN7LDpCz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2021
हिना गावित म्हणाल्या की, नंदुरबार जिल्हा आणि मतदारसंघात गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, ताई आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करुन दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय़ घेतला नाही. शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त 500 इंजेक्शन दवाखान्यांना दिले.
मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त 500 इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला 1 हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचं कळालं. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हा साठा विकला असल्याचा आरोप गावित यांनी केला.