मुंबई : ‘ उत्तर प्रदेशच्या हाथरास घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळत आहे. अनेकांनी या नराधमांना फाशी देण्याची मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे मुली किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.
देशात अशाप्रकारे अत्याचाराचे कृत्य करणाऱ्या नराधमांना पुढील आठ ते दहा वर्षे जगू शकतात, आमच्यावर कडक कारवाई होत नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जो किडा आहे तो असाच राहणार आहे. जोपर्यंत आपल्या देशातील कायद्यात बदल होत नाहीत तोपर्यंत हे सतत घडत राहणार आहे,’ असे नवनीत राणा म्हणाल्या.
Read Also :
योगी आदित्यनाथ यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही,त्यांनी राजीनामा द्यावा ! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भाजपवर निशाणा https://t.co/vPzeItkCuO#NitinRaut #YogiAdityanath @NitinRaut_INC
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020