पुणे : मागील काही दिवसापासून शरद पवार गटातील जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात सुप्त संघर्ष बघायला मिळत आहे. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून तसेच युवा प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांनी काही सवाल उपस्थित केले होते. त्यावरून जयंत पाटलांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर शरद पवारांना रोहित पवारांना खडसावलं असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता रोहित पवारांनी मोठं विधान केलंय.
रोहित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुमची तयारी आहे का ? असा सवाल केला. त्यावर ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पद रिकामं होणार नाही. जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सारख्या लोकांना काम करण्याची संधी जर पद आणि पदासकट मिळत असेल तर निशअचितच आवडेल. मात्र, कोणतं पद हे शरद पवार ठरवतील.
हेही वाचा…“आता मोठा भाऊ, छोटा भाऊ चालणार नाही”, पृथ्वीराज चव्हाणांनी खडसावलं
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय दृष्टीकोणातून तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामधील काही आमदार आणि नेते कुठेतरी काहीतरी कुजबूज करत असतील. कारण त्यांच्या कोणावरच विश्वास नसल्यामुळे त्यांनी घरच्या व्यक्तीला ते पद देण्याचा निर्णय घेतला असेल. कारण अजित पवारांचा कोणावरही विश्वास नसेल. आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं आहे. आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं असल्याचेही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :