अकोला : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकता आले आहेत त्यामुळे राज्यात काँग्रेसची हवा दिसून येत आहे. मात्र अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये नाना पटोले आपल्या कार्यकर्त्याकडून चिखलात माखलेले पाय धुवून घेताना दिसतायेत श. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे
सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले गेले होते. त्या कार्यक्रमानंतर फोटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. ही पालखी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदाना व मुक्कामी होती. त्या ठिकाणी पावसामुळे मोठा चिखल झाला होता.
त्या चिखलातून मार्ग काढत पटोलेयांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आपल्या गाडी जवळ आलेल्या नाना पटोले यांनी आपले पाय चिखलाने माखले होते. ते पाय एका कार्यकर्त्यांनी आपल्या हाताने धुतले. त्यावेळी नाना पटोले त्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिच्याकडून नाना पटोले यांच्यावरती महायुतीकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/share/r/cqs7mCsshT19hxoh/?mibextid=oFDknk