पिंपरी । विशेष प्रतिनिधी ‘पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील शरद पवार’ अशी ओळख असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शड्डू ठोकला’ आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध विलास लांडे असा तगडा सामना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम घुमू लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील तीनही मतदार संघातील विद्यमान आमदार आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघ शहराच्या राजकारणात महायुतीला एकमवेव सक्षम पर्याय आहेत. त्याबाबत त्यांनी ‘दैनिक लोकमत’ला प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष भोसरीकडे लागले आहे.
हेही वाचा…गजा मारणे अन् निलेश लंके भेट, अजित पवार गटाने डिवचलं, म्हणाले..
नगरसेवक, महापौर, आमदार असा सुमारे ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला शहराच्या राजकारणातील एकमेव नेता म्हणून विलास लांडे राज्यभरात परिचित आहेत. राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे नाते आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या असहकार्यामुळे लांडे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. २०१४ मध्ये राष्ट्रवादीतील मोठ्या गटाने महेश लांडगे यांचा छुपा प्रचार केला. २०१९ मध्ये शेवटपर्यंत राष्ट्रवादीने तिकीटाची घोषणा केली नाही. विधान परिषद निवडणुकीत संधी असतानाही माघार घेण्यास भाग पाडले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात महामंडळावर संधी असतानाही डावलण्यात आले. त्यामुळे गेल्या १० वर्षांत विलास लांडे यांना ‘राजकीय सेटबॅक’ बसला. पण, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलली आहेत.
हेही वाचा..एनडीए आघाडीमध्ये लवकरच भूकंप होणार ? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत
विलास लांडे महायुतीला सक्षम पर्याय…
२०१४ मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मैदानात असलेले विलास लांडे यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर महेश लांडगे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. पण, आता राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये असल्यामुळे पुन्हा लांडगे यांचा भाजपाच्या तिकीटावर ‘क्लेम’ राहणार आहे. त्यामुळे विलास लांडे यांना महायुतीतून तिकीट न मिळाल्यास महाविकास आघाडी किंवा अपक्ष असे दोन पर्याय आहेत. महाविकास आघाडीची लोकसभेतील कामगिरी पाहता विलास लांडे हे महाविकास आघाडी किंवा महायुती तिकीट मिळो व न मिळो. पण, आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील प्रस्थापितांना विलास लांडे हे सक्षम पर्याय ठरणार आहेत.
महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका व सक्षम पर्यायाचा निर्धार…
‘‘गेल्या १० वर्षांमध्ये भोसरीतील बकालपणा वाढला आहे. याला जबाबदार कोण?’’ असा प्रश्न उपस्थित करीत लांडे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, रस्ते, वाहतूक, आरोग्य, अनधिकृत बांधकामे अशा प्रश्नावर बोट ठेवले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. समस्या वाढल्या आहेत, असा दावा करीत एकप्रकारे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनावर घणाघात केला आहे. विशेष म्हणजे, भोसरीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि आव्हाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा दावाही लांडे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘शहराच्या राजकारणातील शरद पवार’ असलेले विलास लांडे ‘फिनिक्स भरारी’ घेतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”