नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमधील हाथरास बलत्कारप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यानंतर देशाचे राजकीय वातावरणही तापले आहे.
यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर पुन्हा एकदा प्रियंका यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मैं यूपी के मुख्यमंत्री जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ-
परिजनों से जबरदस्ती छीन कर पीड़िता के शव को जलवा देने का आदेश किसने दिया?
पिछले 14 दिन से कहां सोए हुए थे आप? क्यों हरकत में नहीं आए?
और कब तक चलेगा ये सब? कैसे मुख्यमंत्री हैं आप? pic.twitter.com/Q2qPcDXDTT
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. “मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते. कुटुंबीयांकडून जबरदस्तीने हिसकावून घेत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कोणी दिला?, मागील 14 दिवसांपासून तुम्ही कुठे झोपला होतात? कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Read Also :
आज रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वचनबद्धता सिद्ध झाली- लालकृष्ण अडवाणी
https://t.co/ZKPSq2HCgI @LKAdvaniBJP @narendramodi @Dev_Fadnavis @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020