रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मंदिर परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरीतील शारदादेवीच्या मंदिरात त्यांनी गोंधळ घालत वयोवृद्धाला मारहाण केली.
शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समितीची नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होती. यावेळी अचानक येत भास्कर जाधव यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी हा प्रकार एका वयोवृद्ध नागरिकाने या प्रकाराचा मोबाईल व्हिडिओ केला. त्यावेळी जाधव यांनी व्यक्तीला मारहाण केली.
या घटनेचा व्हिडीओ 6 ऑक्टोबरचा असून, याबाबत कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही.