नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील दक्षिण नगर चांगलाच चर्चेत आली होती. याठिकाणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून डिवचलं होतं. त्यानंतर संपुर्ण प्रचारादरम्यान लंकेंनी याचा आधार घेत सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला होता. यातच आता संसदेत निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेऊन दिलेलं चॅलेंज पुर्ण करून दाखवलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली. तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे सुजय विखे पाटलांनी म्हटले होते. यानंतर सुजय विखे पाटलांवर राजकीय वर्तुळातून जोरदार टिका झाली. यानंतर निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचं आव्हान स्विकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिले होते. मात्र आता संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे पाटील यांना एकप्रकारे उत्तर दिले आहे.
यानंतर निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीत माझ्यावर काही आरोप केले. संसदेत गेल्यावर इंग्रजीत बोलावं लागतं. तो मुद्दा गाजला. मला ट्रोल केलं गेलं. त्या मुद्याला बगल देण्याकरता मी बोलयचो की संसदेत इंग्रजीत बोलणारा खासदार हवाय की तुमची प्रभावीपणे बाजू मांडणारा हवाय? याचा प्रभाव मतदारांवर पडला. विजयी झाल्यानंतर मी एका मुलाखतीत सांगितलं की संसदेत जेव्हा जाईन तेव्हा पहिलं जे बोलेने ते इंग्रजीत बोलेन. त्यामुळे आज मी शपथ इंग्रजीत घेतली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारमधील खासदारांचा संसदेत सध्या शपथविधी होत आहे. काल संपुर्ण मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर आज उर्वरित खासदार शपथ घेत आहेत. यातच आज महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीत तर काही हिंदीत तर काहींनी इंग्रजीमधून खासदारकीची शपथ घेतली.
READ ALSO :
हेही वाचा..आधी राम मंदिराची गळती, आता बाणगंगेच्या पायऱ्यांची तोडफोड.. भाजप पराभवाचा सुड घेतोय ?
हेही वाचा..चित्रा वाघ यांची लागणार विधान परिषदेवर वर्णी, भाजपकडून हिरवा कंदील ?
हेही वाचा..तिघांचं भांडणं अन् चौथ्याचा लाभ ? जुन्नर विधानसभेची निवडणुक यंदा लक्ष्यवेधी ठरणार ?
हेही वाचा..लोकसभेत पराभव तरी सुप्रिया सुळे अन् नंतर सुनेत्रा पवारांनी घेतली एकाच वेळी खासदारकीची शपथ
हेही वाचा..संसदेत खासदारकीची घेतली शपथ, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी लिहिलं ‘ते’ पत्र