पिंपरी चिंचवड : आगामी काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी १५ दिवसांत शहरातील राजकीय वर्तुळात मोठा भुकंप होणार असून अजित पवार गटातील २० ते २५ आणि भाजपमधील किमान ०६ माजी नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. यातच आता प्रत्येक ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी आपापला फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं सध्या राजकीय चित्र दिसत आहे.
शरद पवार गटात येणाऱ्या नेत्यांमध्ये दोन मातब्बर नेत्यांचा देखील समावेश आहे. यातच या नेत्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेची एक फेरी पुर्ण झाली असून पिंपरी चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात आमच्यासोबत येणाऱ्या इच्छुकांना संधी द्या. महायुतीला आस्मान दाखवू अशा प्रकाराची ग्वाही संबंधित नेत्यांकडून दिली जात आहे.
हेही वाचा..तिघांचं भांडणं अन् चौथ्याचा लाभ ? जुन्नर विधानसभेची निवडणुक यंदा लक्ष्यवेधी ठरणार ?
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी पुन्हा लढण्याचे संकेत दिले आहेत. परंतु त्याचबरोबर भाजपचे शहाराध्यक्ष शंकर जगताप यांनी देखील निवडणुक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतील अजित पवार गटातील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही लढण्याची इच्छा व्यक्त केलीय.
महायुतीत गर्दी असल्याकारणाने आता काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वाट्यावर असल्याचं समजत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी आता महायुतीत इच्छुकांची धडपड सुरू झालीय. विशेष म्हणजे हा मतदारसंघ तुतारी ऐवजी मशालवर लढवण्यासाठी इच्छुकांनी पहिली पसंती दिलीय. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मशाल चिन्हावर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुतारी फिंकण्याचा कयास आहे.
हेही वाचा..लोकसभेत पराभव तरी सुप्रिया सुळे अन् नंतर सुनेत्रा पवारांनी घेतली एकाच वेळी खासदारकीची शपथ
पिंपरी विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटात असलेले अण्णा बनसोडे आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळेल, या आशेने एक ज्येष्ठ माजी नगरसेविका मातोश्री वारी करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाला नसता तर राष्ट्रवादीची उमेदवारी याच नगरसेविकाला निश्चित मानली जात होती. त्यामुळे आता बदललेल्या समीकरणानुसार अजित पवार यांच्या निकटवर्ती नगरसेविका मशाल चिन्हावर लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
भोसरी विधानसभेतून महायुतीत अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि शहाराध्यक्ष अजित गव्हाणे निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र काही काही वर्षांपासून याठिकाणी भाजपच्या महेश लांडगे यांनी हा मतदारसंघ चांगलाच बांधून ठेवला आहे. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेत आता अजित पवार गटातील दोन्ही नेत्यांनी मातोश्री आणि मोतीबाग अशा दोन्ही ठिकाणी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभेआधीच महायुतीत कुरबुरी अन् कटकटीची ठिणगी, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
हेही वाचा..भाजपच्या सुर्यकांता पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा..“त्यामुळेच संसदेत आज इंग्रजीत शपथ घेतली”, निलेश लंकेंनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा..आधी राम मंदिराची गळती, आता बाणगंगेच्या पायऱ्यांची तोडफोड.. भाजप पराभवाचा सुड घेतोय ?
हेही वाचा..चित्रा वाघ यांची लागणार विधान परिषदेवर वर्णी, भाजपकडून हिरवा कंदील ?