सोलापुर : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गद्दार असा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. अलिकडेच संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना आम्हाला गद्दर म्हणाल तर याद राखा असा इशारा दिला होता. यानंतर सोलापुरचे शिवसेनेचे कार्यकर्ते अतुल भवर आणि पनवेलचे शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी संतोष बंगार यांना प्रतिआव्हान दिलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बोलवाल, त्याठिकाणी आम्ही येण्यास तयार असून त्याचठिकाणी तुमच्या कानशिलात मारू असा आव्हान त्यांनी संतोष बांगर यांना दिलं आहे.
“३ वर्षांपासून तोंड दाबून मार सहन केलं, पण आता नाही”; ढाण्या वाघानी सोडली सेना
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांनी गद्दारच नव्हे तर शिव्या-शापही दिले होते. शिवसेनेशी कट्टर असलेले बांगर मात्र, बहुमताच्या दिवशी शिंदे गटात सहभागी झाले होते. आता शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रत्येक आमदाराला गद्दार म्हणण्याचा जणूकाही ट्रेंडच सुरु झाला आहे. याचत आता शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी देखील संतोष बांगरच्या कानशिलात मारण्याचं आव्हान स्विकारलं आहे.
“काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, त्यासाठी..;” गडकरींची भर कार्यक्रमातच टोलेबाजी
एक वेळा नाही तर लाखवेळेस आपण त्यांना गद्दार म्हणणार असेही प्रशांत जाधव यांनी म्हटलं आहे. तर एकदा नाही तर हजार वेळा तुला गहार म्हणेन. मला हात तर लावुन दाखव. शिवसेनेला आव्हान देणारी औलाद हिंदुस्थानात अजून जन्मली नाही, असा इशारा अतुल भवर यांनी संतोष भांगरला दिला आहे. संतोष बांगर यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेना सोशल मीडीया समन्वयक अयोध्या पौळ यांनीही आमदार बांगर यांना सुनावले होते.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार फुटला; द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान
हिमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारुन दाखवावी, असं आवाहन केले होते. 2019 ला उदव साहेबांनी मातोश्रीवर बोलवुन त्याला तिकीट दिलं तो या गद्दाराच्या गटात सामील झालाय, मातोश्रीशी बांगर यांनी गद्दारी केली. संतोष बांगर माझ तुला खुलं आव्हान आहे. फक्त सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही बोलव मी तिथे येतो. ज्या शिवसैनिकांनी मोठ केलं. त्या शिवसनिकांना मारण्याची भाषा करणारे संतोष बांगर जर हिमत असेल तर एका शिवसैनिकाच्या केसाला हात लावुन दाखवावे, बाहेरून आलेले लोक या गटात सामील झालेले आहेत. जो बाळासाहेबांचा उदव साहेबांचा आणि मातोश्रीशी इमान राखणारा शिवसैनिक गोलेला नाही, असं अतुल भवर यांनी म्हटलं आहे.
Read also
- हाकालपट्टी केलेल्या नेत्यांना विविध पदांची लॉटरी ; शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
- व्हायरल व्हिडीओ नंतर श्रीकांत देशमुखांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल
- दिपाली सय्यद अन् राऊतांकडून प्रकरण चिघळवण्याचं काम; यामुळेच शिवसेना लयास गेली?
- पद्मश्री लक्ष्मण मानेंनी हाताला बांधलं घड्याळ; त्यांच्यासह १८ जणांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
- महाराष्ट्र सरकारकडून एसटी अपघातातील मृतांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर