मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली. त्यावरून राज्यात सध्या देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. तर विरोधकांकडून फडणवीसांवर जोरादर टोलेबाजी केली जात आहे. यातच आता लोकांची घरे फोडून, पक्ष फोडून येईन असे गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी असं म्हणताहेत. असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा..फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत, ठाकरे गटाच्या नेत्याने फडणवीसांना डिवचलं, म्हणाले..,
लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, संविधान बदलाचा अपप्रचार, मराठा आरक्षण देऊनही त्याबाबत झालेला अपप्रचार असे काही मुद्दे होते. आता लवकरच आमची एक सविस्तर बैठक पक्षस्तरावर, दुसरी बैठक महायुतीतील नेत्यांच्या स्तरावर होईल. पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते यांनी उत्तम काम केले आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा..“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं
तसेच महाराष्ट्रात अपयशाची संपुर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पुर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करीन असं देवेंद्र फडणवीसांनी जाहिर केले. त्यावरून मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फोडून सांगणारे आता: मला जाऊदे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र!@BJP4Mumbai… https://t.co/RY0bm96tHQ— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा..अजित पवार गटातील आमदार बंडाच्या तयारीत, तातडीची बोलावली आमदारांची बैठक
हेही वाचा..अजित पवार गटाचे नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर, राज्यात पुन्हा राजकीय भुकंप
हेही वाचा..“शक्य असेल तर आता गुजरामध्ये एखादा मतदारसंघ शोधा”, धनंजय मुंडेंना डिवचलं
हेही वाचा..अमेठीत स्मृती ईराणींचा पराभव, कॉंग्रेसचे किशोरीलाल ठरले जायंट किलर
हेही वाचा..१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी