नवीदिल्ली : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर सरकारचे जबर वचक असावे यासाठी योगी सरकारने आता एक नामी कल्पना काढली आहे जेणेकरून अत्याचारी व्यक्ती असे कृत्य करण्याचा विचार देखील करणार नाही. यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर छेडछाडीचे प्रकार घडले, त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याचे पोस्टर्स संपूर्ण शहरात झळकावण्यात येणार आहेत. यापूर्वीही योगी सरकारने असं पाऊल उचललं होतं.
मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवतील, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलून दोषींवर कारवाई करावी. त्याचसोबत यात जे गुन्हेगार दोषी आढळतील त्यांचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशात काय म्हटलं आहे ?
महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणाऱ्या आरोपींना महिला पोलिसांनी दंड द्यावा
महिला पोलिसांनी अशा गुन्हेगारांना अद्दल घडवावी
तसेच या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या लोकांचीही नावे जाहीर करावीत.
ज्याप्रकारे एन्टी रोमिया स्क्वॉडने छेड काढणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवला तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याने हे अभियान राबवावे.
कुठेही महिलांवर अत्याचार होत असेल तर त्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असेल.
Read Also
इतके जवान तर पाकिस्तानने देखील पुलवामामध्ये मारले नव्हते…कंगनाची CM ठाकरेंवर पुन्हा टीकाhttps://t.co/EdCrj9rh96#kanganaRanaut #CMUddhavThackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020