वाशिम : राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांचा निकाल?
- धुळे – 15
- नंदूरबार – 11
- अकोला – 14
- वाशिम -14
- नागपूर -16
- पालघर-15
कोणत्या पंचायत समितीच्या किती जागांचा निकाल?
- धुळे -30
- नंदूरबार -14
- अकोला -28
- वाशिम -27
- नागपूर -31
- पालघर-14
वाशिम जिल्ह्यातील 14 जिल्हा परिषदेसाठी तर पंचायत समितीच्या 27 गणा करिता काल मतदान प्रक्रिया पार पडली असून या मध्ये 193 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्याचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. काल 3 लाख 51 हजार 257 मतदार पैकी 2 लाख 22 हजार 871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात 63.45 टक्के मतदान झाले असून आज सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच मतदार राजाने नेमका कौल कोणाला देईल याचे चित्र 10 च्या नंतर स्पष्ट होणार आहे.
Read Also :
- पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा राज्य सरकारला घरचा आहेर!
- अजितदादा, पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्या, अन्यथा…- अमोल मिटकरी
- शिवसेना खासदार संजय राऊत राहूल गांधीच्या भेटीला; नेमकी काय भूमिका घेणार?
- किरीट सोमय्यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या कठोर अटी
- हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर असं शिवसेनेचं वागणं : सताभाऊ खोत