नादेंड : भाजप पुरस्कृत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे रिपाई आठवले गटाचे आमदार राजेश पवार यांचा शुक्रवारी दि.१४ वाढदिवसाच्या बँनर वरुन आमदार राजेश पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना सोयीस्कर बाजूला केले. ज्यांच्या कोट्यातून आमदारकी मिळाली त्यांचा आमदार राजेश पवार यांना विसर पडला असल्याने आठवले गटामध्ये नाराजी बघायला मिळत आहे.
वाढदिवासनिमित्त राजेश पवार यांनी व त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या जाहिराती व मतदार संघातील लावण्यात आलेले बँनवर गल्लीतील कार्यकर्तापासून ते पंतप्रधानांपर्यंतचे फोटो झळकले. मात्र केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना जागा मिळाली नसल्याने मतदासंघात वेगळ्या चर्चेला उधान आले आहे.
आमदार राजेश पवार हे उच्चशिक्षीत असून ते पूणे येथील शिवाजी मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या नेत्याला स्थान देणे अपेक्षीत होते. परंतु तसे झाले नसल्याचे दिसून येते आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे वडिल स्वर्गीय संभाजी पवार यांच्या सहवासात वाढले. त्यांच्या बोटाला बोट धरुन राजकारण शिकले. त्यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये नायगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. पुन्हा त्यांनी सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोट्यातून त्यांनी नायगाव मतदार संघातून निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडणूक काळात त्यांनी आपल्या खांद्यावरील निळा रुमाल खाली पडू दिला नाही. मात्र निवडून येताच त्यांनी प्रचारासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना झिडकारले. एवढचे नाही तर एकाही विकास कामाच्या भूमीपुजनासाठी किंवा महत्वाच्या कार्यक्रमात त्यांना स्थान दिले नाही.