राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
दरम्यान शरद पवरांचा लेव्हल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
लागण झाल्यांपैकी पाच जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहे. तर एक स्वयंपाक करणारी महिला तर एका ड्रायव्हरचा समावेश आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला देखील कोरोना झाल्याचे समोर आले होते
मंत्री बाळासाहेब पाटील पॉझिटिव्ह आल्यानंतर कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात हे कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. वरळी डोम इथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता महापालिका सिल्वर ओक परिसरात फिव्हर कॅम्प घेणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.