2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळाला 1 वर्ष उलटून गेली आहेत. आता काँग्रेसमध्ये काही ज्येष्ठ नेते गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तींची पक्षाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी अशी मागणी करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक सोमवारी पार पडणार आहे. केसी वेनूगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी या आपल्या पदावरून हटण्याची शक्यता आहे व गांधी कुटुंब सोडून इतर नेत्याची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता देखील आहे.
काही नेते पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नावाला पाठिंबा देत आहेत. राहुल गांधी हे सरकारची आर्थिक धोरणे, चीन सीमावाद, बेरोजगारी अशा अनेक मुद्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. मात्र दुसरीकडे काही नेते, गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्ती अध्यक्षपदावर निवड करण्याची मागणी देखील केली जात आहे.