पुणे : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने करोना प्रतिबंधक नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत आणि त्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही नागरिकांना केले असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पोलीस यंत्रणांना दिले आहेत. तसेच, त्यांनी प्रशासनाला लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
आज या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, पुणे शहर लॉकडाऊनसंबंधी आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक, पुण्यातील कौन्सिल हॉल येथे होत आहे. यावेळी, पुणे शहरांमध्ये लॅाकडाउन टळला असला तरी अधिकचे निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता नव्या नियमावलीनुसार स ६ ते सा ६ पर्यंत शहरात पूर्णपणे बंद रेस्टॅारंट आणि बार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच पीएमपी, मॅाल,, आठवडी बाजार हे ७ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार याशिवाय कोणत्याही सामाजिक , सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांना बंदी. लग्नाला ५० आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकतात. तसेच, खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधी प्रमाणेच सुरु राहणार असून शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे.