मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच मुंबईत भाजपकडून तसेच शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची थेट एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महायुतीत काही जागांचा तिढा सुटलेला आहे. मात्र काही जागांमध्ये महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यातच मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. दक्षिण मुंबई हा मतदार संघ सध्या शिंदे गटाकडे जाऊ शकतो. या ठिकाणाहून मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव हे दिग्गज नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र शिंदे गटाकडून ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची थेट ऑफर दिलीय.
दरम्यान, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे अरविंद सावंत यांच्या विरोधात अद्यापही तगडा उमेदवार दिसत नसल्याने माहिती कडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस झाली आहे. यातच आता नार्वेकर शिंदे कटाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलाय.
मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरे पासून उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पक्षासाठी काम करत राहिले आहेत. मिलिंद नार्वेकर यांची ओळख ठाकरे कुटुंबातील हनुमान रााहिली असून पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आहेत. त्यामुळे आता नार्वेकर काय भूमिका घेतील त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.