मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती.त्यानंतर राजकीय वर्तुळातून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना राज्यातील आणि महापालिकेतील सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचे दरेकर यांनी म्हंटले आहे. तसेच भाजप कंगनाची कोणत्याही ट्विटचे समर्थन करत नाही मात्र महापालिकेकडून केली जाणारी कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचे मत प्रवीण दरेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना व्यक्त केले आहे.
काय म्हणालेत नेमकं प्रवीण दरेकर यावेळी
कंगनाच्या ट्विटच समर्थन करत नाही
पालिकेने केलेली कारवाई समर्थनीय नाही
तात्काळ कारवाईची घाई का ?
या कामाचा उद्देश स्वच्छ नाही ?
महापालिका आणि राज्यातील सत्तेचा दुरुपयोग
Read Also
. . मग बुलडोझर शाहरुख खानच्या बंगल्याकडे देखील वळवाhttps://t.co/FE5mj7GbdQ@KanganaTeam @NiteshNRane @iamsrk
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 9, 2020