पुणे : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला आणि सुप्रिया सुळे यांना निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाची नोटीस आल्याचे म्हंटले होते.त्यानंतर याबाबत मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आम्ही कोणतीही नोटीस द्यायला सांगितल्याचे स्पष्ट केले होते. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः मला आणि पवार साहेबाना नोटीस आल्याचे म्हंटले आहे. पुणे जिल्हा परिषद येथे एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
देशात सध्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अॅँगलवरुन बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबीकडून चौकशा सुरु आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवं असं, सुळे यांनी म्हटलं आहे.
आयकर विभागाकडून आलेल्या नोटीस बाबत बोलताना सुळे यांनी सांगितले मला, पती सदानंद सुळे, पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नोटीस देखील नोटीस आली आहे. तसेच या नोटिसांना आम्ही सविस्तर उत्तर देऊ. ज्या दिवशी आम्हाला ही नोटीस आली त्याच दिवशी वर्षभरापूर्वीही एक नोटीस आली होती. जे संबध महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले आहे आम्ही आमचे काम करू,असे सुळे यावेळी म्हणाल्या.
Read Also
शिवसेनेत जातीचे राजकारण ! शिवसैनिकांचे थेट CM ठाकरेंना पत्रhttps://t.co/rjhmI8enxS#Shivsena #Uddhavthackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020