मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्या प्रवेश कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलय. पण या समारंभाला पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. अजित पवार नाराज असल्याचंही बोललं जात होत. आता अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये खडसेंच पक्षात स्वागत केलं आहे.
अजित पवारांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर ते विलगीकरणात आहेत. पण त्यांनी विडिओ कॉल करून एकनाथ खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे आणि अजित पवार यांची बातचीत घडवून आणली आहे.
काल मुंबईत एका कार्यक्रमात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यातच आता भाजपचे आणखी काही आमदार महाविकास आघाडी सरकारच्या गळाला शक्यता वर्तवली जात आहे, कारण आता मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करून एक नवीनच गौप्यस्फोट केला आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते.
भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे या चर्चा बंद होतील, आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
Read Also ;
पुणेकरांनी मोदींकडे बघावे ते २२ तास काम करतात, चंद्रकांत पाटलांचा चिमटाhttps://t.co/iDS7jD14gh @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020