खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राणा कुटुंबातील बारा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली.
दरम्यान, आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली