डीस्चार्ज मिळाल्यानंतर शहा यांनी पुन्हा कामकाजाला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या मतदार संघातल्या विविध विकास कामांचं व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्घाटन केलं.
30 ऑगस्टला अमित शहा यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना काही दिवसांनी अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शऩिवारी त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास वाटत असल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
उपचार घेत असलेले रुग्णालयातूनही सक्रिय होते. कालच त्यांनी गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील २२९ कोटींच्या जलपूर्ती योजनेचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन केले गेले आहे. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहांनी योजनेचे भूमिपूजन केले होते.